Home गडचिरोली आमदार कृष्णाजी गजबे यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

आमदार कृष्णाजी गजबे यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

168

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील चामोर्शी माल परिसरातील शेतशिवारात येथे ७ ऑक्टोबर 2023 रोजी रात्रीच्या दरम्यान रानटी हत्तीचा कळप आल्याने धान पिकाची प्रचंड प्रमाणात नुकसान झाली. याची माहिती मिळताच आमदार कृष्णाजी गजबे यांनी प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

दरम्यान आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम यांना भ्रमणध्वनी करून पंचनामा करण्याच्या सूचना यावेळी आमदार कृष्णाजी गजबे यांनी दिल्या. नुकसान पाहणीवेळी सरपंच ज्ञानेश्वर धारणे, सोशल मीडिया संयोजक ओमकार मडावी, ग्रा. पं. सदस्य शेखर धंदरे, पुंडलिक मानागडे, श्यामराव मंगरे, कैलास गोहणे, किशोर भोयर, रुमाजी खेवले, गुनेश्वर बानबले, योगाजी मेश्राम, किरण घोडाम तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!