Home गडचिरोली भाजपा सिरोंचा तालुका अध्यक्षपदी दिलीप सेनिगारापू यांची निवड

भाजपा सिरोंचा तालुका अध्यक्षपदी दिलीप सेनिगारापू यांची निवड

136

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ७ ऑक्टोबर : भारतीय जनता पार्टी सिरोंचा तालुका अध्यक्षपदी भाजपाचा कार्यकर्ता दिलीप सेनिगारापू यांची निवड जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी केली आहे. सेनिगारापू हे मागील 17 – 18 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे काम निष्ठेने करत असून तालुका कार्यकारणीत व जिल्हा युवा मोर्चा कार्यकारणीत याआधी अनेक पदे भूषवली होती. मात्र एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या शनिगारापू यांची भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्ष निवड करून त्यांच्या पक्षातील कार्याची दखल घेतली आहे. भारतीय जनता पार्टी नेहमीच मेहनती कार्यकर्त्यांना न वगळता त्यांना पद देऊन कार्याची दाखल घेत असते आणि हे फक्त भाजपामध्येच शक्य असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

सेनिगारपू यांनी आपल्या निवडीचे श्रेय गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आमदार रामदासजी आंबटकर, गडचिरोली जिल्ह्याचे माजी अध्यक्ष किसनजी नागदेवे, गडचिरोली – चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, गोविंद सारडा, प्रकाश गेडाम, भाजपाचे ज्येष्ठ नेते सत्यनारायण मंचालवार यांना दिले आहे.

पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थकी ठरविणार असून यापुढे सुद्धा पक्ष मजबुतीचे काम निष्ठेने करणार आहे. तालुक्यात पक्ष संघटन अधिक मजबूत करून पक्षाला भरभराटीला नेण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार, अशी ग्वाही भाजपाचे नवनियुक्त सिरोंचा तालुका अध्यक्ष दिलीप सेनिगारापू यांनी बोलून दाखविली आहे. सेनिगारापू यांच्या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीचे संदीप राचर्लावार, बापू रंगूवार, शंकर नरहरी, कलाम हुसेन, रवि चकिनारापूवार, माधव कासर्लावार, नागेश ताडबोईना, सितापती गट्टू, भास्कर गुडमेटला, श्रीनाथ राऊत, श्रीनिवास चिल्कामारी, तिरुपती नूसेट्टी, मल्लांना संगर्ती, मधुकर नीलम आदींनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!