Home गडचिरोली स्वच्छता ही एक देशसेवाच : आमदार डॉ. देवराव होळी

स्वच्छता ही एक देशसेवाच : आमदार डॉ. देवराव होळी

150

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात चामोर्शी, दहेगाव येथे स्वच्छ्ता अभियान

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या १७ सप्टेंबर या वाढदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या २ऑक्टोबर जयंतीपर्यंत सुरू असलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता – सेवा पंधरवाडा’चे औचित्य साधून व माननीय पंतप्रधान यांच्या आवाहनावरून चामोर्शी व दहेगाव येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या नेतृत्वामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता ही एक प्रकारची मोठी देशसेवाच असल्याचे याप्रसंगी आमदार डॉ. देवरावजी होळी म्हणाले.

यावेळी दहेगाव व चामोर्शी परिसरातील रस्ते व अस्वच्छ असणाऱ्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष आनंदजी भांडेकर, भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, जिल्हा सचिव साईनाथजी बुरांडे, बंगाली आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेशजी शहा, चामोर्शी शहराचे अध्यक्ष सोपानजी नैताम, ज्येष्ठ नेते जयरामजी चलाख, प्रतीकजी राठी, संतोषजी भांडेकर, दीपक वासेकर, सतीशजी भांडेकर, राजू धोडरे, अनिल भैसारे, निखिल धोडरे, रामचंद्र वरवाडे, साईनाथ गव्हारे, वासुदेव चिचघरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला.

error: Content is protected !!