Home गडचिरोली शिवशौर्य जागरण यात्रेचे लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांनी केले स्वागत

शिवशौर्य जागरण यात्रेचे लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांनी केले स्वागत

146

– छत्रपती शिवाजी महाराज जागरण यात्रेचे गडचिरोली शहरात आगमन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शिवराज्याभिषेक 350 वर्ष पूर्ती निमित्याने विश्व हिंदू परिषद व बजरंग दल च्या वतीने श्री. छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे संपूर्ण देशभरात आयोजित करण्यात आले. श्री. छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आगमन गडचिरोली शहरामध्ये झाले. त्यानिमित्ताने चंद्रपूर रोडवरील पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस येथे लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे व पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेसचे संचालक अनुराग पिपरे यांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत पुष्पहार अर्पण करून श्री. छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे स्वागत केले.

यात्रेमध्ये शिवप्रतिष्ठान सांगलीचे प्रल्हाद पांडुरंग माने, गौरक्षक प्रफुल बिजवे, बजरंग दल जिल्हा संयोजक सचिन ठाकूर, जिल्हा मठमंदिर प्रमुख सुरज काटवे, प्रखंड मंत्री विशाल बिजवे, प्रखंड संयोजक बालाजी भांडेकर व विश्व हिंदू व परिषद बजरंग दल संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!