Home गडचिरोली महामोर्चातून आज कुणबी बांधव करणार शक्तिप्रदर्शन

महामोर्चातून आज कुणबी बांधव करणार शक्तिप्रदर्शन

91

– आरक्षणाच्या हक्कासाठी एकवटणार समाज बांधव, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा

– सर्वपक्षीय नेत्यांचा महामोर्चाला पाठिंबा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्यातील मराठा समाजाच्या वतीने कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी होत आहे. ही मागणी कुणबी समाजासह ओबीसी बांधवांवर अन्यानकारक आहे. त्यामुळे राज्य शासनाने मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आज, ५ ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चातून कुणबी समाज शक्तिप्रदर्शन करणार आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव आज एकवटणार आहे. या महामोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठींबा दर्शविला आहे.

error: Content is protected !!