Home गडचिरोली अजय कंकडालवार यांनी जखमी अजय कुळमेथ यांची रूग्णालयात घेतली भेट

अजय कंकडालवार यांनी जखमी अजय कुळमेथ यांची रूग्णालयात घेतली भेट

144

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील व्येंकठरावपेठा गेर्रा येथील अजय कुळमेथे हे अहेरीवरून त्यांचे काम आटोपून आपल्या घरी जात असताना बामणी फाट्यावर दुचाकी वाहनावरून नियंत्रण सुटल्याने खाली पडला असता काही सामाजिक कार्यकर्त्यांनी युवकाला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात येते उपचारासाठी दाखल केले.

ही माहिती कार्यकर्यांनी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि. प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना भ्रमणध्वनीद्वारे कळवातच क्षणाचाही विलंब न करता उपजिल्हा रुग्णालयात अहेरी दाखल झाले व कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून त्या युवकाच्या तब्येतीची विचारपूस केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जास्त दुःखापद नसल्याचे सांगितले. यावेळी अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, प्रकाश दुर्गे, प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!