Home गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने ‘मेरी माटी मेरा देश व स्वच्छता पंधरवडा’ कार्यक्रमाला सुरुवात

नगर परिषदेच्या वतीने ‘मेरी माटी मेरा देश व स्वच्छता पंधरवडा’ कार्यक्रमाला सुरुवात

109

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २५ सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहरामध्ये नगर परिषदेच्या वतीने ‘मेरी माटी मेरा देश व स्वच्छता पंधरवडा’ कार्यक्रम, वृक्षारोपण व स्वच्छता कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

स्थानिक शाहूनगर साई मंदिर येथे खासदार अशोकजी नेते, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, मुख्याधिकारी सूर्यकांत पिद्दुरकर यांच्या हस्ते मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत साई मंदिर परिसरातील हनुमान मंदिर व भुस्कुटेताई यांच्या घरील तुळशी वृंदावना जवळील माती कलशमध्ये घेण्यात आली. साईमंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व शाहूनगर येथे रॅली काढण्यात आली. यावेळी माजी नगरसेविका लताताई लाटकर, देवाजी लाटकर, नगर परिषद येथील कर्मचारी, शाहूनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!