– नारीशक्ती वंदन अधिनियमाला लोकसभेत मिळाली मंजुरी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, २४ सप्टेंबर : नारीशक्ती वंदन अधिनियमाला संसदेत मंजुरी मिळाली असून भविष्यात होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार व या आरक्षणाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाचा भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोलीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौक येथे प्रभारी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात फटाके फोडून व पेढे भरवून मोदी सरकारचे व मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे अभिनंदन करून व धन्यवाद देऊन आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी जिल्हा सचिव प्रतिभाताई चौधरी, जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके, शहराध्यक्ष कविताताई उरकुडे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, लताताई लाटकर, रश्मी बाणमारे, पुष्पाताई करकाडे, लक्ष्मीताई कलंत्री, पल्लवी बारापात्रे, पूनम हेमके, नीताताई बैस, ज्योती बागडे, रंजनाताई शेंडे, रेखाताई उईके, अर्चनाताई निंबोड, महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.






