Home गडचिरोली आलापल्ली येथील भव्य श्रीरामनवमी शोभायात्रेत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची विशेष उपस्थिती

आलापल्ली येथील भव्य श्रीरामनवमी शोभायात्रेत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची विशेष उपस्थिती

138

– आलापल्ली शहरात राममय आणि भक्तिमय वातावरण

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी : श्रीरामनवमी निमित्ताने संध्याकाळी आलापल्ली शहरात श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली, माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्ररिशराव आत्राम यांची या शोभायात्रेत विशेष उपस्थिती होती. यावेळी राजेंनी श्रीरामाचे विधिवत पूजन व आरती करीत दर्शन घेतले तसेच पायदळी या भव्य शोभायात्रेत सामील झाले.
अहेरी विधानसभा क्षेत्रात आलापल्ली हे शहर मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी विविध सण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरे केले जातात. रामनवमी निमित्त रामभक्तांनी कालपासूनच शहरात भव्य तयारी केली होती. सकाळपासून विविध कार्यक्रम घेत सायंकाळच्या सुमारास भव्य शोभायात्रा काढली. हाती भगवे ध्वज, भगवे फेटे परिधान केलेले शेकडो युवक, युवती तसेच परिसरातील नागरिक या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ठिकठिकाणी आलापल्लीकरांनी या भव्य रॅली व शोभायात्रेचे स्वागत केले. श्रीराम मंदिरातून निघालेली शोभायात्रा विर बाबूराव चौक, बस स्टँड चौक, श्रीराम चौक आणि वि.दा. सावरकर चौक परत तिथेच समापन झाले. यावेळी डिजे व बेंजोच्या तालावर महिला, पुरुष, युवक, युवती एकच जल्लोष केले तर चिमुकल्यांनी सुद्धा लेझिम डान्सद्वारे सर्वांना मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे आलापल्ली शहरात हजारो रमाभक्तांच्या उपस्थितीत ही शोभायात्रा पार पडली. यावेळी संपूर्ण शहरात राममय तथा भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

error: Content is protected !!