तेली समाजाची बैठकीत विविध विषयांवर चर्चा

61

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दि. 8 डिसेंबर 2022 रोजी श्रीसंत जगनाडे महाराज यांची जयंती कार्यक्रम घेण्याबाबत तेली समाजाची नियोजनाची महत्वपूर्ण बैठक संताजी स्मृती प्रतिष्ठानचे व प्रांतिक महासभा जिल्हा गडचिरोलीचे दक्षिणचे अध्यक्ष प्रभाकरराव वासेकर यांच्या अध्यक्षतेखाली तथा संताजी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रांतिक तैलिक महासभा जिल्हा गडचिरोलीचे उत्तरचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संताजी सभागृहात घेण्यात आली. या बैठकीला संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक देवानंद कामडी, एडवोकेट रामदास कुनघाडकर, विदर्भ तेली महासंघाचे अध्यक्ष सुरेशराव भांडेकर, संताजी मंडळाचे सचिव गोपीनाथ चांदेवार, सुधाकर दूधबावरे, दिवाकर पिपरे, संताजी पतसंस्था गडचिरोलीचे मुख्य प्रवर्तक भैय्याजी सोमनकर, बालाजी भुरले, प्रफुल आंबोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत आगामी 8 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात नियोजन करण्यात आले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली व कार्यक्रमाला जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे ठरविण्यात आले.
तसेच या जयंती कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी तेली समाज गडचिरोलीची महत्वपूर्ण बैठक दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी तेली समाजाच्या सर्व बांधवांनी व संताजी सोशल मंडळाच्या पदाधिकारी सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.