करमटोला येथील निकुरे कुटुंबाला शिवसेनेने दिला आधार

97

– शिवसेना सहसपंर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिली आर्थिक मदत

– वनविभागाने वाघाचा बंदोबस्त न केल्यानेे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने 10 नोव्हेंबर रोजी मुख्य वनसरक्षक कार्याल्यावर मोर्चा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मौशिखांंब – मुरमाड़ी जिल्हा परिषद क्षेत्रातील करमटोला परिसरात नरभक्षक वाघाने धुमाकुळ घातला असून वनविभागाने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त न केल्यामुळे व्याघ्रबळीच्या घटनात वाढ होत आहे. करमटोला येथील शेतकरी प्रभाकर निकुरे हे घरची जनावरे चराईसाठी गावाजवळील जंगलपरिसरात गेले असता जंगलात दबा धरून बसलेल्या नरभक्षक वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केल्याची 24 ऑक्टोम्बर 2022 रोजी घटना घडली. या घटनेमुळे निकुरे कुटंबियावर आघात कोसळला.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी करमटोला येथे जाऊन निकुरे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. हिंदू हदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक म्हणून जनसेवेचा वसा जोपासून निकुरे कुटुंबाला आर्थिक मदत दिली. अमिर्झा परिसरात गेल्या वर्षभरापासून नरभक्षक वाघाचे वास्तव्य आहे. या नरभ़क्षक वाघाने मागील वर्षभरात अनेक महिला नागरिकांचा बळी घेतला आहे. वाघाने दिभना गावातील तर तब्बल चौघांचा बळी घेतला आहे. व्याघ्रबळीच्या घटना वारंवार घडत असतानाही वनविभागाने त्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त केलेला नाही करमटोला येथील शेतकरी प्रभाकर निकुरे हे 24 ऑक्टोम्बर 2022 रोजी घरची गुरे चारण्यासाठी गावालतगत असलेल्या जंगल परिसरात गेले होते. जनावरे चारत असताना अचानक जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने निकुरे यांच्यावर हल्ला करून ठार केले. घटनेची माहिती शिवसैनिकांनी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांना दिली.जनसेवेच्या कार्यात सदैव अग्रेसर असलेले कात्रटवार यांनी शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण यानुसार सामाजिक बांधीलकी जोपासत वाघाचा बळी ठरलेल्या प्रभाकर निकुरे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली. तसेच शासनाकडून देण्यात येणारी आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी यावेळी दिले. वाघाच्या घटेनमुळे करमटोला परिसरातील अनेक गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून याचा परिणाम शेतीकामावर झाला आहे. गावाजवळील जंगलपरिसरात घरची जनावरे चराईसाठी नेल्यानंतर वाघाच्या हल्याच्या घटना वाढत आहे. त्यामुळे जनावरे कुठे चारावी व त्यांचे संगोपण कसे करावे, त्याचबरोबर शेतीची मशागत न केल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. वनवीभागाने वाघाचा बंदोबस्त न केल्यामुळे सततच्या होणाऱ्या व्याघ्रबळीच्या घटनेमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने दिनक 10-11-2022 रोजी मुख्यवनसरक्षक कार्यल्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या निकुरे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देताना शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, नवनाथ ऊके, संदीप अलबनकर, प्रशांत ठाकुर, संदीप भुरसे, संजय बोबाटे, सचिन निलेकर, मुकेश गुरनुले, सूरज उइके, अमित बानबले, आनंदराव चुधरी, दिलीप चनेकर,.ईश्वर लाजुरकर, पूंजीराम चुधरी, भगवान चनेकर, राहुल खेवले, तानाबा दाजगाये, नानाजी काळबांंधे, राहुल सोरते, स्वप्निल खांडरे, अंबादास मुनघाते, धनेश्वर सुरकर, धानेश्वर फुकेट, सूरज कोलते, निकेश लोहबरे, सूरज शेंडे, विलास देशमुख, सोनू ठाकरे, रविंद्र मिसार, निरंजन लोहबरे, जगन चापडे, मोतीराम भुरसे, गोपाल मोगरकर, रूमान भांडेकर, विलास नैताम, दिलीप वलादे, अमित उईके, कवडुजी धन्द्रे, राहुल मड़ावी, गणेश दहलाकर, यादवजी चौधरी, जविन कुरुड़कर, विनोद लेनगुरे, वैभव तिवाड़े, हेमंत चुधरी, सुनील करतेस, पूर्ण उन्दिरवाडे, मोतीराम चंद्रगिरी, समीर शेख, सचिन भुसारी, मुकेश आवारी, मुरारी धोटे, भूषण गुरुकार, चंद्रभान कोमलवार यांच्यासह शिवसैनिक व करमटोला येथील नागरिक उपस्थित होते.