माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. अजय कंकडालवार यांनी भेट देवून केली जखमीला आर्थिक मदत

67

– बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी, कोलपली येथील शेतशिवारातील घटना

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील कोलपली गावातील महिला नामे मैनाबाई शामराव सड़मेक हि स्वतःच शेतात कापूस लावून असल्याने कापसाच्या देखरेख करण्यासाठी ती स्वतः व 8 महिन्याचा मुलगा अन्वीर अक्षय सड़मेक शेतात राखण करत होते. अचानकपणे बिबट्या कापसाच्या जुडुपातून येवून सदर महिलेवर व मुलावर झडप मारून हल्ला केला असता सदर महिला व मुलाला पाठीवर व पायांवर हल्ला केल्याने जखमी झाले होते. प्रसंग सावधानीने तिने बिबट्याच्या तावडीतून सुटले असून सदर महिलेला ला अहेरी येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून प्राथमिक उपचार करण्यात आले असुन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांनी भेट देवून नातेवाईकांसोबत चर्चा करून आर्थिक मदत केली असून वनविभागाकडुन आर्थिक मदत त्वरित मिळवून देण्यासाठी सहकार्य करू असे सांगितले. यावेळी उपस्थित श्री. अजयभाऊ नैताम, प्रशांत गोडसेलवार व फारेस्टचे कर्मचारी नातेवाईक उपस्थित होते.