Home गडचिरोली माजी जि. प.अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते घोटपाळी येथील भव्य क्रिकेट...

माजी जि. प.अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते घोटपाळी येथील भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

136

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भामरागळ:-तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ग्रा.प.परायणार अंतर्गत ग्रामसभा घोटपाळी यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला व दूसरा असे पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे. आज सदर स्पर्धेचे उद्घाटक माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. लालसू आत्राम माजी पंचायत समिती सभापती भामरागड,विष्णू मडावी उपाध्यक्ष न. पंं. भामरागड, तपेश हलदर, लक्ष्मीकांत बोगामी, शामराव पेपकवार, सुधाकर कोरेत माजी सरपंच, श्रीकांत बंडमवार, महेश परपा, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, कार्तिक तोगम माजी उपसरपंच, राकेश सडमेक तसेच गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष मनोज पुसू वड्डे उपाध्यक्ष दोघे पल्लो, कोषाध्यक्ष रामजी वड्डे सचिव सुधाकर मिच्छा, क्रीडा प्रमुख राजेश पुंगाटी यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!