Home गडचिरोली लम्पी स्किनचे मोफत व लवकरात लवकर लसीकरण सुरू करा : महेंद्र ब्राम्हणवाडे

लम्पी स्किनचे मोफत व लवकरात लवकर लसीकरण सुरू करा : महेंद्र ब्राम्हणवाडे

129

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्यात मोठ्या प्रमाणात गाय- बैलांवर लम्पी स्किन आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आधार असणाऱ्या गाय- बैलांचे मृत होण्याचीही संख्याही वाढत आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांंचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शेतीचे पीक यावर्षी गेले. परंतु अनेक शेतकऱ्यांंचे उदरनिर्वाह या जनावरांवर अवलंबून होते. मात्र लम्पी स्किन नावाचे आजार शेतकऱ्यांची नवी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झालेला आहे. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे पालक म्हणून विचार करत आणखी कोणतेही दुर्घटना होण्याआधी जिल्ह्यातील गाय- बैल व अन्य लम्पी स्किन होऊ शकणाऱ्या जनावरांंचे मोफत व तत्काळ लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांंकडे केलेली आहे.

error: Content is protected !!