महाआवास अभियान २.० अंतर्गत प्रत्येक गरजुला मिळणार घर : आमदार डॉक्टर देवरावजी होळी

100

– पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रत्येक गरजूला घर मिळण्यासाठी करणार प्रयत्न

– आजादी का अमृत महोत्सवानिमित्त कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या जनकल्याणाच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन

– १ वर्षाच्या आत घरकूल बांधणार्‍या लाभार्थ्यांंचा, घरकुल योजनची उत्तम प्रकारे अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतीचा सत्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पंतप्रधान आवास योजने अंतर्गत प्रत्येक गरजूला घर मिळावे याकरिता केंद्र सरकारने महाआवास अभियान २.० अंतर्गत घर मिळावे यासाठी शासन स्तरावरून यंत्रणा कामाला लागल्याने लवकरच प्रत्येक गरजूंना घर मिळतील असा विश्वास आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी चामोर्शी येथील पंतप्रधान आवास योजना व इतर राज्य पुरस्कृत योजना अंतर्गत महाआवास अभियान २.० या कार्यक्रमात केले.

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या जनकल्याणाच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

यावेळी संवर्ग विकास अधिकारी सागर पाटील, सहाय्यक बीडीओ, पंचायत समिती विस्तार अधिकारी, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, महामंत्री विनोद गौरकर, साईनाथ बुरांडे, जयराम चलाख, प्रतीक राठी, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी १ वर्षाच्या आत घरकुल बांधणार्‍या लाभार्थ्यांंचा, घरकुल योजनची उत्तम प्रकारे अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतीचा व घरकुला संबंधित उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते करण्यात आला.

पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येक गरजूला घर मिळावे याकरिता पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ केला. त्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत कोट्यावधी गरजू लोकांना घरकुल बांधून देण्यात आले. मात्र अजूनपर्यंत असंख्य गरजू घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा गरजूंना घरकुल योजनेचा लाभ मिळावा व तातडीने घर व्हावे याकरिता महाआवास महाअभियान २.० अंतर्गत घरकुल निर्माणाचा काम सुरू करण्यात आले आहे. त्या अंतर्गत शासन यंत्रणा कामाला लागल्याने लवकरच प्रत्येक गरजूला घर मिळेल, असा विश्वासही त्यांनी या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केला.