गडचिरोली तालुक्यातील दिभना येथील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या नीलकंठ मोहुर्ले यांच्या कुटुंबाला शिवसेनेचा आधार

115

– गडचिरोली तालुक्यातील दिभना येथील वाघाच्या हल्ल्याची घटना

– वाघाचा बंदोबस्त करण्याची शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांंनी केली मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील दिभना येथील नीलकंठ मोहुर्ले हे शेतकामासाठी शेतावर गेले असता शेतालगत असलेल्या जंगलात दबा धरून बसलेल्या नरभक्षक वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. या घटनेमुळे कुटुंंबियावर आघात कोसळला. शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिभना येथे जाऊन मोहुर्ले कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच सेवाभाव जोपासून आर्थिक मदत दिली.
दिभना गाव परिसरात गेल्या वर्षभरापासून नरभक्षक वाघाचे वास्तव्य आहे. या नरभ़क्षक वाघाने मागील वर्षभरात दिभना गावातील चौघांचा बळी घेतला आहे. वाघ्रबळीच्या घटना वारंवार घडत असतानाही वनविभागाने त्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त केलेला नाही. दिभना येथील निलकंठ मोहुर्ले हे २६ जुलै रोजी जंगलालगत असलेल्या आपल्या शेतात गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण यानुसार सामाजिक बांधीलकी जोपासून शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने वाघाचा बळी ठरलेल्या निलकंठ मोहुर्ले याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली. तसेच शासनाकडून देण्यात येणारी आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन कात्रटवार यांनी यावेळी दिले.
वाघाच्या घटेनमुळे दिभना अमिर्झा परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून याचा परिणाम शेतीकामावर झाला आहे. शेतीची मशागत न केल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. दिभना परिसरातील वाघ्रबळीच्या घटनांबाबत शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी नुकतेच गडचिरोली दौऱ्यावर आलेले राज्याचे विरोधी पक्ष नेते मा. अजीतदादा पवार साहेब यांची भेट घेऊन लक्ष वेधले. वनविभागाने नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाला तातडीने निर्देश द्यावेत, अशी मागणी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी विरोधी पक्ष नेते मा. अजीतदादा पवार साहेब यांच्याकडे केली. दिभना येथील मोहुर्ले कुटुंबियांना आर्थिक मदत देताना अरविंदभाऊ कात्रटवार, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख यादव लोहंबरे, संजय बोबाटे, नवनाथ ऊके, संदीप अलबनकर, सूरज उइके, स्वप्निल खांडरे, निरंजन लोहबरे, संदीप भुरसे, गोपाल मोगरकर, बापूजी वासेकर, नानाजी काळबन्धे, हरबाजी दाजगये, रामदास बह्यल, निकेश लोहबरे, भास्कर भुरसे, तानबा दाजगये, विकास उन्दिरवाडे, विलास दाजगये, रविंद्र मिसार, शामराव कुकुड़कर, विनोद मड़ावी, सुनील सोनटक्के, चंद्रभान मड़ावी, जगन चापडे, किसान लोहबरे, मंगरु कुकुड़कर, अरुण बारापत्रे, यांच्यासह शिवसैनिक व गावातील नागरिक उपस्थित होते.