दिपस्तंभ बुद्ध विहाराच्या प्रांगणात बुद्ध जयंती उत्साहात साजरी

74

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दिपस्तंभ बुद्ध विहार अनमोल नगरच्या प्रांगणात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात विहाराच्या प्रांगणात असलेल्या तथागत गौतम बुद्धांच्या मुर्तीला वंदन, पंचशील ध्वजारोहण व त्रिशरण पंचशील वंदना ग्रहण करून करण्यात आली.
पंचशील ध्वजारोहण दिपस्तंभ बौद्ध मंडळाच्या अधयक्षा मालाताई मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले वंचित बहुजन घाडीचे बाळू टेंभुर्णे, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे देवेंद्र सोनपिपरे, वंचितचे जी. के. बारसिंगे, गुरदास डोंगरे, शैलेश रामटेके आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना बाळू टेंभुर्णे म्हणाले की, या जगात व देशात जेव्हा केव्हा निसर्गनिर्मित अथवा मानवनिर्मित विनाशकारी घटना घडतात तेव्हा बुध्दाच्या विज्ञानवादी विचाराची अाठवण केल्या जाते परंतु जर जगातल्या लोकांनी आत्तापासूनच बुद्धाच्या विज्ञानवादी विचाराची कास धरली तर मानवनिर्मित विनाशकारी घटना घडणार नाहीत, म्हणूनच बुद्धांच्या विचाराची कास धरणे काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी उपस्थित पाहुण्यांनी सुद्धा समायोचीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल वनकर यांनी तर संचालन प्रफुल मेश्राम व अाभार अजित बोरकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेश मेश्राम, लताताई बोरकर, प्रियंका नंदेश्वर, अनिता कांबळे, सिमा गोवर्धन, अंजुषा मेश्राम, अंजली मेश्राम, संघपाल रामटेके, शामला मेश्राम, वैशाली वनकर, सत्यजित मेश्राम, सोनी मेश्राम यांनी परिश्रम घेतले. यावेळी अनमोल नगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.