खरीप हंगामापूर्वी नियमित पिककर्ज भरणा करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहनपर अनुदान द्या

88

– भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये यांची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : नियमित पिककर्ज भरणा करणाऱ्या शेतकरी बांधवांंना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली. यामुळे शेतकरीवर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र नियमित पिककर्ज भरणा करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात दिरगांई झाली. मात्र या संदर्भात शासनाने तरतुद करुन पोत्साहपर अनुदान देण्यासाठी अमंलबजावणीचे काम सुरु असुन शासनाने प्रतिक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांंना प्रोत्साहनपर अनुदान खरीप हंगामापूर्वी त्वरित देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कुरखेडाचे उपाध्यक्ष चांगदेव फाये यांनी केले आहे.
शेतीसाठी दरवर्षी पिककर्ज घेणारा शेतकरी हा प्रामाणिकपणे घेतलेला पिककर्ज बँकेने दिलेल्या वेळेत किती आर्थिक अडचणी असल्या तरी न चुकता भरतो. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने घोषणा केली. मात्र सदर घोषणाची अंमलबजावणी करण्यात मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत आहे. त्यामुळे नियमित पिककर्ज भरणा शेतकरी प्रोत्साहनपर रक्कम कधी भेटतो यासाठी संबंधितांना वारंवार विचारणा करत असुन प्रोत्साहरपर रक्कम भेटेल या अपेक्षेने आहे. त्यामुळे नियमित पिककर्ज भरणा करणाऱ्या शेतकरी बांधवांना खरीप हंगामापूर्वी प्रोत्साहनपर रक्कम देवुन दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कुरखेडा उपाध्यक्ष चांगदेव फाये यांनी केले आहे.