ओबीसी समाजावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, नाकर्त्या सरकार विरोधात गडचिरोली येेेथील इंदिरा गांधी चौकात एक दिवसीय लक्षणिक उपोषण

105

– राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात ओबीसींंचे गेले राजकीय आरक्षण : खा. अशोकजी नेते

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी तथा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा गडचिरोलीतर्फे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ओबीसी समाजावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भाजपाचा इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे एक दिवसीय लक्षणिक उपोषण करण्यात आले. त्याप्रसंगी महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले. राज्य सरकारने एम्पिरिकल डाटा सादर न केल्याने, ट्रिपल टेस्ट करून सुद्धा मागासवर्गीय आयोग स्थापन करू शकले. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी आरक्षण टिकले नाही. याला संपूर्ण जबाबदार महाविकास आघाडी राज्यसरकार आहे, अशी टीका करण्यात आली.
यावेळी लाक्षणिक उपोषणाला बसलेले खासदार अशोकजी नेते, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, बाबुरावजी कोहळे विदर्भ संघटन मोर्चा तथा ओबीसीचे ज्येष्ठ नेते, प्रमोदजी पिपरे, प्रशांतजी वाघरे महामंत्री, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनीलजी पारधी, ओबीसी संघटक नेते प्रकाशजी बगमारे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, किसान आघाडी प्रदेश सदस्य तथा जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, रेखाताई डोळस प्रदेश सदस्य महिला आघाडी, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, गोविंदजी सारडा, ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री भाष्कर बुरे, गडचिरोली शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, गडचिरोली न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहर महामंत्री केशव निंबोड, विनोद देवोजवार, भाजपा जिल्हा पदाधिकारी अनिल पोहनकर, मधुकर भांडेकर, बंडुजी झाडे, चामोर्शी तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे, विनोद गौरकर, जेष्ठ नेते जयरामजी चलाख, युवा मोर्चाचे राजू शेरकी, कीर्तिकुमार मासुरकर, नरेंद्र भांडेकर, सुनील विश्वास, प्रज्वल गेडाम, श्याम उईके, विनोद गौरकर, संजय खेडेकर, ज्ञानेश्‍वर चौधरी, जीवन भोयर, गुनेश्वर चुधरी, जीवन भोयर यांच्य्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.