आघाडी सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत गंभीर नाही : देवेंद्र फडणवीस

119

– गडचिरोली येथे भाजपाच्या वतीने महाजनआक्रोश मोर्चा व जाहीर सभा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : केंद्र सरकारने राज्य सरकारला ओबीसींचा इंपिरियल डाटा मागितला असता दीड वर्ष तो दिला नाही. यावरून आघाडी सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत गंभीर नसल्याची टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने गडचिरोली येथील अभिनव लॉन येथे महाजन आक्रोश मोर्चा व जाहीर सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक नेते, भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. उपेंद्रजी कोठेकर, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णाजी गजबे, आमदार बंटी भांगडीया, माजी मंत्री राजे अम्ब्रिशराव आञाम, माजी आमदार अतुल देशकर, भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, भाजपा नेते प्रकाश पोरेड्डीवार, माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिताताई भांडेकर, भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, गोविंद सारडा, बाबुराव कोहळे, प्रशांत वाघरे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठ, भूमिगत गटार योजना, धडक सिंचन विहिरींसाठी निधी दिला. मात्र आघाडी सरकार जनतेच्या विरोधात असून या सरकारच्या काळात भ्रष्टाचार फोफावला असल्याची टीका केली. यावेळी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णाजी गजबे यांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला. या जाहीर सभेचे संचालन भाजपा जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार यांनी तर आभार प्रदर्शन भाजपा जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे यांनी केले. या मोर्चाला व जाहीर सभेला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.