ग्रामीण डाक सेवकांवरील अन्याय दूर करावा : माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे

95

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय डाक विभागामध्ये ग्रामीण डाक सेवकांचे कार्य महत्वपूर्ण असून ग्रामीण डाक सेवकांवरील अन्याय दूर करून त्यांना न्याय देण्यात यावा, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केले आहे.
ग्रामीण डाक सेवकांना विभागीय दर्जा देण्यात यावा, १२-२४-३६ वर्ष सेवेनुसार वेतन लागु करावे व इतरही मागण्या घेवुन ग्रामीण डाक सेवक संघटनेचे द्विवार्षिक अधिवेशन स्थानिक जिल्हा परिषद कनिष्ठ विज्ञान महाविध्यालय येथील हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष बोलत होत्या.
कार्यक्रमाला माजी जि. प. अध्यक्ष योगीताताई भांडेकर, AIDGSU चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सर्कल सचिव पि. एच. जयस्वाल, नवी मुंबई रिजनल सचिव दिनेश शहापूरकर, नागपूर रिजनल सचिव ए. बि. राऊत, चंद्रपूर विभाग विभागीय सचिव मारोती सातपुते, चंद्रपूर विभाग अध्यक्ष साईनाथ भांडेकर तसेच ग्रामीण डाकसेवक कार्यकारिणीतील पदाधिकारी, ग्रामीण टपाल सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारोती सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन आशिष लांडे तर आभार निवेदिता पुनवटकर यांनी मानले.