कोविड योद्धयांच्या सत्काराने नमाद महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

99

विदर्भ क्रांती न्यूज

गोंदिया (प्रतिनिधी) : गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात भारतीय प्रजासत्ताकाचा ७३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोविड १९ या महामारीच्या काळात कोविड योद्धा म्हणून विशेष कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आला. तत्पूर्वी राष्ट्रीय छत्र सेनेच्या विध्यार्थ्यानी पथ संचालन केले. कोविड योद्धा म्हणून कार्य केलेले गोंदिया तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, डॉ. विलास एन. सिरसाटे डॉ. जुनैद सय्यद आणि त्यांच्या टीमचा प्राचार्या डॉ. महाजन यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. शारदा महाजन म्हणाल्या, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने अमूल क्रांती केलेल्या काळात कोविड १९ या महामारीने साऱ्या जगाला प्रभावित केले. काही काळ सारं जग थांबलं होत. अर्थव्यवस्था प्रभावित झाली. शिक्षण सुद्धा काही काळ बंद केल्या गेले. आताही शाळा महाविद्यालये पूर्ण सुरू होऊ शकले नाहीत. ऑनलाईन शिक्षण यावर उपाय शोधण्यात आला. वैज्ञानिकांनी अथक मेहनत करून कोविड १९ या महामारीवर लस शोधून काढली. कोविड १९ चे शासनाने ठरवून दिलेले नियम पाळणे आणि लस घेणे यामुळेच कोविड १९ या महामारीला आपण हरवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने शासनाने ठरवून दिलेले नियम पाळावेत आणि लास टोचून घ्यावी आणि आपल्या परिसरात त्यासाठी जनजगृती करावी, असे आवाहन डॉ. महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रवीण कुमार तर आभार डॉ. एच. पी. पारधी यांनी मानले. ध्वजारोहन कार्यक्रमाला महाविद्यालयीन प्राध्यापक डॉ. अर्चना जैन, डॉ. एस. यू. खान यांच्यासह अन्य प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.