Home गडचिरोली चामोर्शीत रविवारला निरंकारी महिला संत समागमाचे आयोजन

चामोर्शीत रविवारला निरंकारी महिला संत समागमाचे आयोजन

77

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : संत निरंकारी मिशनच्या वतीने झोनस्तरीय निरंकारी महिला संत समागमाचे आयोजन चामोर्शी येथील मुल मार्गावरील इंपोरियल पॅलेस हॉलमध्ये रविवार, ३१ मे रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत केलेले आहे.

सदर संत समागममध्ये गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यातील अनेक भाविक हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या आशीर्वादाने संत निरंकारी मिशनद्वारे देशभर सर्व झोन स्तरावर महिला संत समागमाचे आयोजन करण्यात येत असून यात महिलांद्वारे मुख्य प्रवचन, भजन व आध्यात्मिक विचार मंथन केल्या जाते.
सदर संत समागमामध्ये ईश्वर एक आहे असे मानून त्याचा साक्षात्कार करून भक्तीचा आनंद कसा घेता येईल, तसेच विश्वबंधुत्व, मानवता, प्रेम इत्यादी दैवी गुणांनी जगात आनंद निर्माण करून चैतन्यमय जीवन कसा जगता येईल यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर संत समागमांमध्ये सर्व ईश्वरप्रेमी जनतेने उपस्थित राहून आध्यात्मिक, सामाजिक, कौटुंबिक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत निरंकारी मंडळाचे झोन प्रमुख किशन नागदेवे व चामोर्शी शाखा मुखी अशोक बोरकुटे यांनी केले आहे.

error: Content is protected !!