Home गडचिरोली सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवा : माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी

सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवा : माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी

53

– सिरोंचा येथे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ अंतर्गत निवासी कार्यशाळा संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजपा परिवाराच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ २०२६ अंतर्गत क्रीडा संकुल सिरोंचा येथे दिनांक ०७-०४-२०२६ ते ०८-०४-२०२६ दोन दिवसीय भाजपा पदाधिकाऱ्यांची निवासी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेला माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले.

डॉ. उसेंडी यांनी सरकारची कामगिरी आणि सरकारच्या योजनांवर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यकर्त्यांना सरकारच्या योजनांना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रेरित केले. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानववाद आणि अंत्योदय सिद्धांतांवर चर्चा करण्यात आली. सरकारच्या जनहितकारी योजनांची माहिती देऊन कार्यकर्त्यांना संगटनाची मजबूती करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी भाजपचा इतिहास व विकास, वैचारिक अधिष्ठान, कार्यपद्धती, कार्यविस्तार आमची दृष्टी, सरकारच्या उपलब्धी व अंमलबजावणी, तसेच बूथ व्यवस्थापन अशा महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांचे नेतृत्व कौशल्य, संघटन कौशल्य आणि समाजसुधारणेची बांधिलकी अधिक दृढ होत असून, स्थानिक पातळीवर सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडविण्याची क्षमता वाढते.

श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या ‘एकात्म मानववाद’ या विचारधारेवर आधारित सेवा, समर्पण आणि राष्ट्रहित या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून भारतीय जनता पक्ष कार्य करत आहे. या विचारांना अधिक बळ देत देशभरातील कार्यकर्त्यांना वैचारिक व संघटनात्मक बळ मिळावे, या उद्देशाने हे प्रशिक्षण महाभियान राबविण्यात येत आहे.

माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव महाराज आत्राम यांनी पक्षाचा इतिहास, पक्षाची विचारधारा, संघटनात्मक कार्यपद्धती आणि जनसेवेची भूमिका यावर मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांना पक्षाच्या मूलभूत मूल्यांवर दृढ राहून जनसेवेचे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर आणि सरकारच्या शेतकरी हितकारी योजनांवर मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांना समजून घेऊन त्यांचे समाधान करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, युवा नेते अवधेशबाबा आत्राम, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जेष्ट नेते सत्यमजी मंचार्लावार, सिरोंचा भाजपा तालुकाध्यक्ष श्रीनाथ राऊत, माजी तालुकाध्यक्ष शंकर नरहरी, ज्येष्ठ नेते दामोधर अरगेला, डॉ. श्रीकांत सुगरवार, संतोष पडाला, किरणताई कुलसंगे, शहराध्यक्ष शरीख शेख यांच्यासह भाजपाचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!