विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणी प्रशिक्षण घेऊन पुन्हा बेरोजगार झाल्या आहेत. राज्य सरकारने त्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचे कबूल केले होते. परंतु सत्तेवर आल्यानंतर सरकारला याचा विसर पडलेला दिसून येत आहे. न्याय मागणीसाठी राज्यभर विविध आंदोलने करून सुद्धा राज्य सरकार याबाबतीत ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. त्यामुळे
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या वतीने 6 एप्रिल रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर यांनी रविवारी स्थानिक गांधी चौकातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.







