Home गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते रामपूर चेक (ओडिगुडम) येथे टेनिस...

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते रामपूर चेक (ओडिगुडम) येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

191

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील रामपूर चेक (ओडिगुडम) येथे सचिन क्रीडा मंडळ यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला, दुुसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे. आज सदर स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सुनीताताई कुसनाके होत्या. यावेळी मंचावर पंचायत समिती सदस्या छाया पोरतेट, सरपंच मीनाताई वेलादी, उपसरपंच सुरेश गंगाधारीवार, मेडपलीचे सरपंच निलेश वेलादी, वेलगुरचे उपसरपंच उमेश मोहुर्ले, ग्रा. पं. सदस्य सविता कोकीरवार, सामाजिक कार्यकर्ते नितीन गुंडावार होते. यावेळी प्रतिष्ठित नागरिक व मंडळाचे अध्यक्ष कार्तिक ठाकरे, दिवाकर चाटरे, प्रशांत देवारवार आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!