रानखेडा येथे नवउत्साही नाट्य कला मंडळाच्या ‘माणुसकी’ नाटकाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते उद्घाटन

118

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील रानखेड़ा येथे नवउत्साही नाट्य कला मंडळ यांच्या सौजन्याने “माणुुुसकी” या नाटकाचे आयोजन 8 जानेवारी रोजी करण्यात आले होते. वर्षभर बळीराजा शेतात राबतो आणि पिकांची मळणी होताच ग्रामीण भागात जनतेच्या मनोरंजनासाठी संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यांच्याच एक भाग म्हणून रानखेड़ा येथे नवउत्साही नाट्य कला मंडळ रानखेड़ा यांच्या सौजन्याने “मानुसकि” या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे उद्धघाटक शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार हे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले बोरावार साहेब, विजय खरवड़े, पांडुरंग समर्थ, यादवजी लोहंबरे, विलास दशमुखे, दत्तात्रेय वायबसे, संदीप भुरसे, बनपूरकर साहेब, मंडळाचे सदस्य गणेश दहेलकर, यादव चुधरी, गोपाल पानसे, लोबाजी झाड़े, अनिता आवारी, मंगेश मड़ावी, अरविंद गेडाम, उमाजी गेडाम, नरेंद्र चुधरी, खेमराज दहेलकर यांच्यासह गावकारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.