Home गडचिरोली उद्यापासून हरांबा येथे ११ कुंडीय गायत्री महायज्ञ संगीत प्रवचन व दिप महायज्ञ

उद्यापासून हरांबा येथे ११ कुंडीय गायत्री महायज्ञ संगीत प्रवचन व दिप महायज्ञ

172
Oplus_16908288

– रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमांचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

सावली : अखिल भारतीय गायत्री परिवार हरांबा तथा समस्त गावकरी मंडळी हरांबा व उमरीच्या वतीने सावली तालुक्यातील हरांबा येथील जीवन विकास विद्यालयाच्या प्रांगणात ९ ते ११ जानेवारी २०२६ रोजी तीन दिवसीय ११ कुंडीय गायत्री महायज्ञ संगीत प्रवचन व दिप महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार, ९ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता ग्रामसफाई करण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता तिलमतनाथ मंदिर ते कार्यक्रमस्थळापर्यंत भव्य कलश यात्रा (लेझीम सहित) काढण्यात येईल. सायंकाळी ५ वाजता सौ. रुक्मिनीजी उपाध्याय (म. प्र.) यांचे संगीत प्रवचन होणार आहे.

शनिवार, १० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता वेदमाता गायत्री शिक्षण संस्था हरांबाचे अध्यक्ष रमाकांत पा. डोईजड यांच्या हस्ते झेंडा वंदन होणार आहे. सकाळी ९ वाजता ११ कुंडीय गायत्री महायज्ञ, दुपारी १ वाजता वैनगंगाकाठ ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था हरांबा यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता सौ. रुख्मिनीजी उपाध्याय (म. प्र.) यांचे संगीत महायज्ञ व १००८ दिप महायज्ञ होणार आहे.

रविवार, ११ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता ११ कुंडीय गायत्री महायज्ञ, विविध संस्कार, पूर्णांहुती व निरोप समारंभ होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला नागरिक, महिला, बालगोपालांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय गायत्री परिवार हरांबा तथा समस्त गावकरी मंडळी हरांबा व उमरीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!