Home गडचिरोली पारडी येथे जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनीचे उत्साहात उद्घाटन

पारडी येथे जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनीचे उत्साहात उद्घाटन

53
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पारडी (ता. गडचिरोली) येथे जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या पशुप्रदर्शनीचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे तर विशेष अतिथी म्हणून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. देवराव होळी (गडचिरोली विधानसभा) यांची उपस्थिती लाभली. यावेळी पारडीचे सरपंच संजय निकारे, कनेरीचे सरपंच तुषार मडावी, जिल्हा परिषद गडचिरोलीचे अति मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुसारी, मोहन ठाकरे, डॉ. बळवंतजी लाकडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शस्त्र, उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक चेतन हिवंज, उपअभियंता (यांत्रिकी) नितीन पाटील यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील अधिकारी डॉ. अजय ठवरे, अनिकेत पाटील, डॉ. भास्कर रामटेके, लीलाधर बेडके आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी उपस्थित शेतकरी व नागरिकांना पशुसंवर्धनाचे महत्त्व विशद केले. पशुपालनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते, रोजगाराच्या संधी निर्माण होतात तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते, असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

या पशुप्रदर्शनीत विविध जातींची जनावरे, आधुनिक पशुसंवर्धन तंत्रज्ञान, शासकीय योजना व मार्गदर्शन स्टॉल्स यांची मांडणी करण्यात आली असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!