Home गडचिरोली अडपल्ली येथे स्थापन झालेल्या विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था (UATI) चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

अडपल्ली येथे स्थापन झालेल्या विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था (UATI) चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

45

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात तंत्रकौशल्य शिक्षणाला चालना देण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ व लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेड यांच्या सार्वजनिक–खाजगी भागीदारीत अडपल्ली (गडचिरोली) येथे स्थापन झालेल्या विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था (UATI) चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म राज्यमंत्री डाॅ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, लॉयड्स मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांची प्रमुख उपस्थिती आहे.

error: Content is protected !!