– नाल्यांची व सांडपाण्याची व्यवस्था उत्तम राखण्याची आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांची संबंधित विभागाला सूचना
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी आज धानोरा तालुक्यातील कारवाफा येथे प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. गावामध्ये सध्या ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजने’ (CMJSY) अंतर्गत रस्त्याची कामे सुरू आहेत. हे काम करत असताना ते अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे व्हावे आणि रस्ता बनवताना पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांची तसेच सांडपाण्याची व्यवस्था उत्तम राखली जावी, अशा कडक सूचना आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.
त्याचबरोबर गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, विद्युत खांबांची व्यवस्था आणि नागरिकांच्या सोयीसाठी मुख्य चौकामध्ये सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून देण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. गावातील विकासकामे दर्जाहीन होणार नाहीत आणि सर्व नागरी सुविधा ग्रामस्थांना वेळेत मिळतील, यासाठी मी प्रयत्नशील असून प्रशासनाला त्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, सिन्नुभाऊ दुल्लमवार, पवनजी येरमे, विश्वनाथजी मस्के, विजयजी गणवेनवार व स्थानिक नागरिक उपस्थित होते.







