Home गडचिरोली गोंडगोवारी बांधवांनी न्याय, हक्कासाठी दिलेले बलिदान निष्ठा व नि:स्वार्थ भावनेचे प्रतिक

गोंडगोवारी बांधवांनी न्याय, हक्कासाठी दिलेले बलिदान निष्ठा व नि:स्वार्थ भावनेचे प्रतिक

48

– सामाजिक कार्यकर्ते अरविंदभाऊ कात्रटवार यांचे प्रतिपादन

– विजय दिवस सोहळ्यासाठी हजारो गोंडगोवारी बांधव एकवटले

– मोहटोला येथे विजय दिवस सोहळा व राणी दुर्गावती मडावी यांच्या स्मारकाचे भूमिपूजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : विजय दिवस सोहळा आपल्या हक्कांसाठी आणि अस्तित्वासाठी सुरू असलेल्या लढ्याची आठवण करून देणारा दिवस आहे. गोंडगोवारी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा यासाठी नागपुरात विशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पोलीस लाठीमारामुळे मोठी चेंगराचेंगरी होऊन शेकडो गोंडगोवारी बांधव समाजाच्या न्याय हक्कासाठी शहीद झाले. या बलिदानाच्या स्मरणार्थ विजय दिवस साजरा केला जातो. हा दिवस गोंडगोवारी आंदोलनाच्या बलिदानाची आठवण करून देणारा दिवस असून गोंडगोवारी बांधवांनी दिलेले बलिदान समाजाप्रती निष्ठा व निस्वार्थ भावनेचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन लोकनेते तथा सामाजिक कार्यकर्ते अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले.

आदिवासी गोंडगोवारी बहुउद्देशिय संस्था मोहटोला बेलगाव यांच्या वतीने ऐतिहासीक विजय दिवस सोहळा, देवी देवतांची महापूजा आणि राणी दुर्गावती मडावी यांच्या स्मारक भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन व स्मारकाचे भूमिपूजन सामाजिक कार्यकर्ते अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी अरविंदभाऊ कात्रटवार बोलत होते.

मार्गदर्शन करताना अरविंदभाऊ कात्रटवार पुढे म्हणाले की, गोवारी समाज हा आजही विकासापासून दूर आहे. शैक्षणिक इतर हक्कापासून समाज वंचीत आहे. विजय दिवस हा समाजाच्या न्याय हक्कासाठी बलिदान देणाऱ्यांना केवळ आदरांजली वाहण्यापुरता मर्यादीत नसून आपल्या हक्कासाठी आणि अस्तित्वासाठी सुरू असलेल्या लढयाची आठवण करून देणारा दिवस आहे. त्यामुळे समाज बांधवांनी एकतेची वज्रमुठ बांधून आपल्या न्याय हक्कासाठी लढा देण्याची गरज आहे, असेही अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले.

मौशीखांब मुरमाडी क्षेत्रातील गोंडगोवारी बांधवांचा विकास झाला पाहिजे. हा समाज इतर समाजाप्रमाणे विकासाच्या प्रवाहात आला पाहिजे. समाजाला त्याचे न्याय हक्क मिळाले पाहिजे ही आपली ठाम मागणी आहे. या भागातील गोंड गोवारी समाजाच्या विकासासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिली.

ऐतिहासीक विजय दिनाचे औचित्य साधून अरविंदभाऊ कात्रटवार मित्र परिवाराच्या वतीने शेकडो माताभगिनींना वस्त्रभेट देऊन नारिशक्तीचा सन्मान करण्यात आला. विजय दिनाचे औचित्य साधून रात्रीच्या सुमारास गांडी व छत्तीसगडी नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. हजारो नागिरकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

याप्रसंगी यादव लोहंबरे, प्रशांत ठाकूर, दीपक लाडे, गोपाल मोंगरकर, यादव चौधरी, जीवन कुरुडकर, विनोद चापळे, स्वप्नील जुमनाके, अमित चौधरी, दिलीप वलादे, देवेंद्र मुळे, प्रकाश होळी, निलेश होळी, अविनाश मडावी, प्रमोद होळी, राजन मडावी, झनकलाल आतला, गजानन होळी, तुकाराम होळी, चंद्रभान मडावी, प्रदीप मडावी, गुरुदेव होळी, हिरसिंग होळी, सुरेश होळी, श्रीकृष्ण होळी, प्रभाकर होळी, योगजी होळी, विनोद मडावी, देवाजी होळी, दिलीप मडावी, रमेश होळी, उद्धव मडावी, श्रीराम मडावी, संदीप होळी, जगदीश मडावी, किशोर मडावी, विजय मडावी व गावकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!