Home गडचिरोली मैदानी खेळ केवळ मनोरंजनाचे साधन नसून खेळामुळे शारीरिक व मानसिक विकास घडतो

मैदानी खेळ केवळ मनोरंजनाचे साधन नसून खेळामुळे शारीरिक व मानसिक विकास घडतो

59

– सामाजिक कार्यकर्ते अरविंदभाऊ कात्रटवार यांचे प्रतिपादन

– ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंचे अरविंदभाऊ कात्रटवारांनी वाढविले मनोबल

– मुरमाडी येथे भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : क्रिकेट असो अथवा अन्य कोणताही मैदानी खेळ असो मैदानी खेळामुळे युवकाचा शारीरिक व मानसिक विकास घडून येतो. खेळाकडे केवळ मनोरंजनाचे माध्यम म्हणून न बघता क्रीडा क्षेत्रात ‘करिअर’ सुध्दा घडविता येते. जय शिवराय क्रिकेट क्लबने ग्रामीण भागातील युवकांना रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून खेळाचे दालन निर्माण केले आहे. खेळाडूंनी खिलाडीवृत्तीने खेळाचे प्रदर्शन करून आपल्या कार्याचा ठसा उमटवावा, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले.

अरविंदभाऊ कात्रटवार यांनी उद्घाटनप्रसंगी खेळाचा आनंद घेत जोरदार बल्लेबाजी करीत खेळाडूंचे मनोबल वाढविले. ग्रामीण भागातील खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा म्हणून जय शिवराय क्रिकेट कल्ब मुरमाडी- कातखेडाच्या वतीने रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील लोकनेते तथा सामाजिक कार्यकर्ते अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते पार पडले.

स्पर्धा मुरमाडी येथील जय डोंगरदेव मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेंतील विजेत्या संघाला अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख 41 हजार रूपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील गावातून उदयोन्मुख खेळाडून निर्माण झाले पाहिजे. या क्षेत्रातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाची छाप पाडली पाहिजे. यासाठी खेळाडूंना आवश्यक ती मदत करण्यास तत्पर असल्याचे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी खेळाडूंचे मनोबल उंचावले.

याप्रसंगी यादव लोहंबरे, प्रशांत ठाकूर, दीपक लाडे, गोपाल मोंगरकर, यादव चौधरी, जीवन कुरुडकर, विनोद चापळे, स्वप्नील जुमनाके, अमित चौधरी, दिलीप वलादे, देवेंद्र मुळे, विकास उंदीरवाडे, पुरुषोत्तम सुर्यवंशी, विनोद खेवले,मुकेश आवारी, कुमोद भुसारी, शुभम भादे, गुरुदास कोहपरे, नितीन ठाकरे, ताजेश्वरजी भुसारी, लक्ष्मीकांत ठाकरे, एकनाथ डोईजड, रोशन कोहपरे, चेतन सय्याम, रवी भुसारी, पिंटू सय्याम, लंकेश सय्याम, रुपेश भुसारी, समीर ठाकरे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!