Home गडचिरोली प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त निवासी अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त निवासी अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

33

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजपा लोकसभा समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या पुणेचे संचालक, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासंघ गडचिरोली जिल्हाध्यक्ष, नगर परिषद गडचिरोलीचे माजी सभापती प्रमोदजी पिपरे यांच्या जन्मदिवसानिमित्त आज शनिवार, 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी प्रथम सेमना देवस्थान येथे सहपत्नीस जाऊन पूजाअर्चा केली. त्यानंतर निवासी अपंग विद्यालय लांजेडा (स्नेहनगर) येथील अपंग विद्यार्थ्यांसोबत केक कापून मुलांचा आनंद द्विगुणित केला. तसेच अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य वाटप करण्यात आले व विद्यार्थ्यांना केक व लाडू देण्यात आले.

प्रमोदजी पिपरे हे सामान्य जनतेचे सामान्य माणूस असल्याने आपला वाढदिवस साधेपनात अपंग मुलांना प्रोत्साहित करीत त्यांच्यामध्ये जाऊन स्वतःचा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे स्वतःची सामान्य माणसाची ओळख या रूपाने दिसली.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष तथा भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष योगिता प्रमोदजी पिपरे, किसान आघाडी भाजपा प्रदेश सचिव रमेशजी भूरसे, पिपरे पेट्रोलपंप गडचिरोलीचे संचालक अनुराग पिपरे, भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष कविताताई उरकुडे, शहर महिला आघाडी कोषाध्यक्ष रोशनी बानमारे, एटीव्हिजे शहर अध्यक्ष पूनम हेमके, राजु शेरकी, दिनेश भुरसे, लोकेश पिपरे, संकेत सेलोटे, शाळेचे मुख्याध्यापक भास्कर दोनाडकर, अधीक्षक उमेश देशमुख व अपंग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!