विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आज शनिवार, 13 डिसेंबर 2025 रोजी भारतीय जनता पार्टीचे लोकसभा समन्वयक,
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणेचे संचालक,
महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा जिल्हा गडचिरोली जिल्हाध्यक्ष तथा नगरपरिषद गडचिरोलीचे माजी सभापती प्रमोदजी पिपरे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे.
वाढदिवसाचे औचित्य साधून सकाळी ११.०० वाजता
निवासी अपंग विद्यालय, लांझेडा (स्नेहनगर), गडचिरोली येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या कार्यालयातील बैठक हॉल गडचिरोली येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमोदजी पिपरे यांच्या सामाजिक, सहकार व राजकीय क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यात येणार असून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येणार आहे. समाजासाठी सातत्याने कार्यरत असलेले नेतृत्व म्हणून प्रमोदजी पिपरे यांचा वाढदिवस हा केवळ उत्सव न राहता सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरणार आहे.







