Home गडचिरोली आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त गडचिरोलीत महिला जागृती व कर्तबगार महिलांचा भव्य प्रवेश...

आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त गडचिरोलीत महिला जागृती व कर्तबगार महिलांचा भव्य प्रवेश सोहळा

55

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली येथे आज, 10 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन निमित्ताने महिला जागृती व कर्तबगार महिलांचा भव्य प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, उद्घाटक म्हणून माजी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, भाजपा जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, सहउदघाटक राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेश उपाध्यक्ष भारतजी खटी, तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेश अध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा अध्यक्ष रमेशजी अधिकारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषाताई मडावी, उपाध्यक्ष लक्ष्मीताई कन्नाके, सचिव तेजस्विनी भज्जे, कोषाध्यक्ष जाहेदा शेख, प्रसिद्धी प्रमुख पल्लवी आत्राम, गडचिरोली तालुका उपाध्यक्ष पूनम हेमके, शहराध्यक्ष स्नेहल मेश्राम, शहर उपाध्यक्ष भूषणा खेडेकर, शहर सचिव राणी गोपशेट्टीवार, शहर प्रवक्ता शीतल मेश्राम उपस्थित राहणार आहेत.

गडचिरोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी ज्यांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेत कार्य करण्याची इच्छा आहे त्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गडचिरोली शहर कार्यकारणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले आहे. सदर कार्यक्रम गोंडवाना विद्यापीठ समोरील वीर बाबुराव शेडमाके अभ्यासिका समोरील पटांगणावर दुपारी 12 वाजता करण्यात आले आहे.

error: Content is protected !!