Home गडचिरोली अमिर्झा (अमरपूर) येथे नागदिवाळी महोत्सव व माणिकादेवी मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा...

अमिर्झा (अमरपूर) येथे नागदिवाळी महोत्सव व माणिकादेवी मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा होणार

146
Oplus_16908288

– लोकनेते अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक

– महोत्सवाचा लाभ घेण्याचे आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना व अरविंदभाऊ कात्रटवार मित्रपरिवाराचे आवाहन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना ग्रामशाखा अमिर्झा (अमरपूर) यांच्या वतीने 13 व 14 डिसेंबर 2025 रोजी माना जमातीचा नागदिवाळी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तसेच माणिकादेवी मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहेण् सदर कार्यक्रम श्रीकांतजी पाटील लांबे यांच्या वाडीमध्ये आयोजीत करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत लोकनेते अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. कार्यक्रम नियोजनबध्द आणि यशस्वीरित्या पार पाडण्याचे आवाहन अरविंदभाऊ कात्रटवार यांनी बैठकीप्रसंगी केले.

शनिवार 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता मुठपुजा व माता माणिकादेवीचे पुजनए रात्री 7 वाजता जागृती भजनाचा कार्यक्रम होईल रविवार 14 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता गावातून शोभायात्रा काढण्यात येईल. सकाळी 10 वाजता माता माणिकादेवी मुर्ती प्राणप्रतिष्ठा होईल दुपारी 12 वाजता उद्घाटन समारंभए सायंकाळी 4 वाजता सामुहीक भोजनाचा कार्यक्रम आणि रात्री 8 वाजता गायक कार्तीक शेंडे आणि संच चंद्रपूर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना व अरविंदभाऊ कात्रटवार मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे बैठकीला आदिवासी माना समाजबांधव व भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

याप्रसंगी यादव लोहंबरे, प्रशांत ठाकूर, गोपाल मोंगरकर, यादव चौधरी, जीवन कुरुडकर, विनोद चापळे, स्वप्नील जुमनाके, अमित चौधरी,सुरेश कोलते, दिलीप वलादे, देवेंद्र मुळे, दीपक लाडे, विकास उंदीरवाडे, पुरुषोत्तम सुर्यवंशी, महेश लाजुरकर, विनोद खेवले, लोमेश कुमरे, निकेश कोलते, देवेंद्र कोटगले, धनंजय चापले, आकाश लडके, विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, अनिल राऊत, नरेश कावळे, तोकेश सहारे, सुरज कलसार, पुरुषोत्तम उंदीरवाडे, विलास भैसारे, छत्रपती भैसारे, कुसन ढवळे, अंबादास मुन्घाटे, आकाश बानबले, लोकेश नैताम, भगवान चनेकार, राकेश मुन्घाटे, अमोल नन्नावरे, प्रफुल डोईजळ, राजेश धारणे, भोजराज नखाते, रामेश्वर निलकंठ कारेते, साईनाथ उईके, लंकेश भजभुजे, क्रिष्णा भोयर, तरंग वाघमारे, गुलाब निकुरे, धनराज कावळे, अमित चौधरी, गणेश गुंटीवार, युजिन चौधरी, प्रशांत पेंद्राम, खुशाल कारेते, आरिफ ढवळे, संदेश सूर्यवंशी, राजेंद्र मेश्राम, पंकज गेडाम, सचिन गुरुनुले, उमेश गेडाम आदी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!