Home गडचिरोली जिल्हा काँग्रेस कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन

जिल्हा काँग्रेस कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन

53

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : उपेक्षित व शोषित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी अखंड संघर्ष करणारे आणि त्यांच्या उद्धारासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कार्यालयात त्यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी शहराध्यक्ष सतीश विधाते, सोशल मीडिया प्रदेश उपाध्यक्ष नंदू वाईलकर, जिल्हा उपाध्यक्ष समशेरखा पठाण, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, सहकार सेल अध्यक्ष अब्दुल पंजवानी, माजी नगरसेवक रमेश चौधरी, प्रभाकर वासेकर, काशिनाथ भडके, लालाजी सातपुते, उत्तम ठाकरे, स्वप्नील बेहरे, कविता उराडे, शालिनी पेंदाम, रिता गोवर्धन सह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!