Home गडचिरोली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्यासह सर्व उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्यासह सर्व उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद

41

– गडचिरोलीत सुरेश शहा यांचा झंझावाती प्रचार दौरा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरात आज भाजपा बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांनी प्रभावी आणि उत्साहवर्धक असा झंझावाती प्रचार दौरा केला. शहरातील विविध प्रभागांमध्ये घरोघरी भेट देत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांच्यासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा प्रचार शहा यांनी दमदार पद्धतीने केला.

प्रत्येक घराशी संवाद साधत भाजपाच्या विकासधार्जिणी भूमिकेची माहिती देताना, गडचिरोली शहराचा सर्वांगीण विकास हा पक्षाचा मुख्य संकल्प असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नागरिकांकडूनही उमेदवारांना भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या झंझावाती प्रचार मोहिमेत मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर आणि मार्गदर्शनावर नागरिकांचा ठाम विश्वास असल्याचे सुरेश शहा यांनी सांगितले. त्यांनी आगामी निवडणुकीत भाजपा उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही केले.

error: Content is protected !!