Home गडचिरोली जनतेचा भ्रमनिरास करणाऱ्या महायुतीला धडा शिकवा : विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार

जनतेचा भ्रमनिरास करणाऱ्या महायुतीला धडा शिकवा : विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार

47
Oplus_16908288

– गडचिरोलीच्या प्रचार सभेतून महायुतीवर टीका

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देशातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी सर्व सामान्य नागरिक यांना महागाईच्या खाईत लोटून महाराष्ट्र राज्याची गुजरात चरणी अस्मिता गहाण ठेवणाऱ्या महायुती सरकारने राज्यातील जनतेचा भ्रमनिरास केला या लुटारू सरकारला येणाऱ्या निवडणुकीत आपण काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून धडा शिकवा, असे आवाहन विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.

गडचिरोली येथे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजित सभेस नगर परिषद निवडणूक गडचिरोली जिल्हा प्रभारी संदेश चिंगलकर, जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, ॲड. राम मेश्राम, मनोहरजी पोरेटी, सतीश विधाते, प्रभाकर वासेकर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. कविता मोहरकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कविता पोरेड्डीवार यांच्यासह नगरसेवक पदाकरिता उभे असलेले सर्व उमेदवार, गडचिरोली जिल्हा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलतांना विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांकडून खनिज संपत्तीची लूट सुरू आहे. तर दुसरीकडे स्थानिक बेरोजगारांना रोजगारापासून दूर करण्याचे पाप हे निष्ठुर सरकार करत आहे. मागील 5 वर्षाच्या काळात नियोजनाअभावी सत्ताधारी भाजपने गडचिरोली नगरपरिषदेची पूर्णतः वाट लावली व विकास कामांच्या कंत्राटातून कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला. सर्वसामान्यांच्या जीवावर उठलेल्या या हेकेखोर व डल्लेबाज सरकारला धडा शिकविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजय करा, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. याप्रसंगी गडचिरोली शहरातील नागरिक व महिला भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या.

error: Content is protected !!