Home गडचिरोली भाजप नेत्याच्या घरून दारूच्या पेट्या जप्त

भाजप नेत्याच्या घरून दारूच्या पेट्या जप्त

119

– चामोर्शी पोलिसांची कारवाई

– जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांच्या घरी तब्बल ४५ पेट्या दारू सापडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. चामोर्शी तालुक्यातील वालसरा येथील भाजप नेत्याच्या निवासस्थानी चामोर्शी पोलिसांनी मंगळवारी पहाटे छापा टाकून दारू जप्त केली आहे. या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजप युवा आघाडीचे चामोर्शी तालुका उपाध्यक्ष रामचंद्र केशव भांडेकर यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता, इतक्या मोठ्या प्रमाणात दारूचा साठा भाजप नेत्यांच्या घरी सापडल्याने ही दारू मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येणार होती काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात भाजपचेच नेते अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करतात. हे जनतेस दिशाभूल करणारे आहे, अशी प्रतिक्रिया समाज माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!