Home गडचिरोली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांनी मानले आभार

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांनी मानले आभार

55

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हयातील सिरोंचा व अहेरी तालुक्याच्या जनतेसाठी आजचा दिवस ऐतिहासिकच ठरणार आहे. दुर्गम भागातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा वैद्यकीय महाविद्यालयाचा शिलान्यास मंजूर करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी या मातीतल्या जनतेचे मोठे स्वप्न साकार केले आहे. त्याबद्दल माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले आहे.

आपल्या भावना व्यक्त करत डॉ. अशोकजी नेते म्हणाले, सिरोंचा, अहेरी व गडचिरोली जिल्ह्याच्या लोकांना आरोग्यसेवा आणि शिक्षणाच्या सोयी आपल्या दारात मिळाव्यात, हे आम्हा सर्वांचं अनेक वर्षांचं स्वप्न होतं.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही मागणी मंजूर करून जनतेच्या मनात नवी आशा जागवली आहे.
मी मुख्यमंत्री साहेबांचे मनःपूर्वक आभार मानतो.”, असे ते म्हणाले.

मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली सिरोंचा व अहेरी तालुका भाजपा परिवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे आजच्या आगमनाचे हार्दिक स्वागत असल्याचे म्हटले आहे

error: Content is protected !!