विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : मुलचेरा येथील आयोजित कार्यक्रमात डॉ. राजे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते अनेक उत्साही युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रियाजभाई शेख, माजी जिल्हा कार्याध्यक्ष बबलूभैय्या हकीम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी नवागत कार्यकर्त्यांचे स्वागत करत पक्षाच्या विकासोन्मुख धोरणे आणि जनसेवेच्या संकल्पनेवर भर दिला. युवकांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद अधिक बळकट झाल्याचे त्यांनी सांगितले.







