Home गडचिरोली इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करावे : महेंद्र ब्राह्मणवाडे

इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करावे : महेंद्र ब्राह्मणवाडे

64
Oplus_16908288

– जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणूक रणसंग्राम

– 3 ते 5 नोव्हेंबरपर्यंत जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली किंवा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्षामार्फत अर्ज स्वीकारण्यात येणार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीमार्फत काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे. इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे.

नगर अध्यक्षकरिता खुला प्रवर्ग 5000/ रु., SC, ST व महिलांकरिता 2500/- रु, नगर परिषद सदस्य खुला प्रवर्ग 2000/- SC, ST व महिलांकरिता 1000/- रु, जिल्हा परिषद सदस्य खुला प्रवर्ग 2500/-रु, SC, ST, व महिलांकरिता 1250/-, पंचायत समिती सदस्य खुला प्रवर्ग 1500/-, SC, ST, व महिलांकरिता 750/- रु प्रमाणे इच्छुकांनी शुल्क भरून 3 ते 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत उमेदवारी अर्ज जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली, आमदार रामदास मसाराम जनसंपर्क कार्यालय वडसा किंवा सर्व तालुकाध्यक्ष यांच्यामार्फत जमा करता येणार आहे.

त्यानंत्तर प्राप्त अर्जापैकी  6 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येथे नगर परिषद (गडचिरोली /आरमोरी /वडसा ) करिता प्राप्त इच्छुक उमेदवारांच्या जिल्हा निवड मंडळ मार्फत मुलाखती घेण्यात येणार आहे. तरी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षामार्फत निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर करावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!