विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणायांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन 31 ऑक्टोबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील पथकाने सापळा रचून अवैध दारूची वाहतुक करणाऱ्या आरोपीविरुध्द कारवाई केलेली आहे.
सविस्तर वृत असे आहे की, 31 ऑक्टोबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांना गोपनिय बातमिदाराकडून माहिती मिळाली की, इसम जिनेश मेश्राम रा. गोकुलनगर (ता. जि. गडचिरोली) व आकाश भरडकर रा. गोकुलनगर (ता. जि. गडचिरोली) हे चारचाकी वाहन क्र. एम. एच. 46 ए. एल. 0027 मधुन चातगाव मार्गे देशी व विदेशी दारुची वाहतुक व पुरवठा करणार आहेत. यावरून सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी चातगाव – कारवाफा टी पॉईंट येथे सापळा रचला असता, एक काळ्या तपकिरी रंगाची महिंद्रा कंपनीची चारचाकी वाहन क्र. एम. एच. 46 ए. एल. 0027 टी पॉईंटच्या दिशेने येताना दिसून आली. यावरून रस्त्यात बॅरीकेट्स लावून अडथळा निर्माण करून पोलीसांनी वाहन चालकास हात दाखवून थांबण्याचा ईशारा केला. परंतु सदर वाहन चालकाने वाहन न थांबविता वाहन साखेरा ते जांभळी गावाकडे जाणाऱ्या रोडवर उभी करुन वाहनातून दोन इसम खाली उतरुन अंधार व जंगलाचा फायदा घेत पळून गेले. यावेळी आरोपी जिनेश मेश्राम रा. गोकूलनगर (ता. जि. गडचिरोली) हा पोलीस पथकास अंधार व जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळून जाताना दिसून आला.
त्यानंतर दोन पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता, सदर चारचाकी वाहनामध्ये रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीचे 45 सिलबंद खाकी खरड्याचे प्रति बॉक्स 100 नग असे एकूण 4500 बॉटल विक्री किंमत 80 प्रमाणे अंदाजे एकुण किंमत 3,60,000/- रुपये, 500 मि. ली. मापाचे हायवर्ड 5000 कंपनीचे 5 सिलबंद खरड्याचे प्रति बॉक्समध्ये 24 टिन बिअर बॉटल असे एकूण 120 नग बिअर विक्री किंमत 350 रु. प्रमाणे अंदाजे एकुण किंमत 42,000/- रुपये, 500 मि. ली. मापाचे खरड्याच्या बॉक्समध्ये बडवायजर मॅग्नम सुपर प्रिमीयम बिअर 04 सिलबंद बॉक्समध्ये प्रति बॉक्स 24 टिन बिअर बॉटल असे एकूण 96 नग बिअर विक्री किंमत 350 रुपये प्रमाणे अंदाजे एकुण किंमत 33,600/- रुपये, 180 एम. एल. मापाचे रॉयल स्टॅग डिलक्स विस्की कंपनीच्या 02 सिलबंद खरड्याचे बॉक्समध्ये प्रति बॉक्स 48 विदेशी दारुच्या निपा असे एकुण 96 निपा विक्री किंमत 400 रुपये प्रमाणे अंदाजे एकुण किंमत 38,400/- रुपये, देशी विदेशी दारु वाहतुक करीता वापरण्यात आलेली एक काळ्या तपकिरी रंगाची महिंद्रा कंपनीची चारचाकी वाहन क्रमांक एम. एच 46 ए. एल. 0027 जुनी अंदाजे किंमत 5,00,000/-रुपये, एक ओप्पो कंपनीचा ॲन्ड्राईड मोबाईल अंदाजे किंमत 6,000/- रुपये, एक विवो कंपनीचा ॲन्ड्राईड मोबाईल अंदाजे किंमत 6,000/- रुपये असा एकुण 9,86,000/- (अक्षरी नऊ लाख शहाएंशी हजार रुपये) रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला.
संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे चातगाव येथे दिलेल्या तक्रारीवरुन कलम 65 (अ), 83, 98 (2), म.दा.का. अन्वये आरोपी जिनेश मेश्राम रा. गोकुलनगर (ता. जि. गडचिरोली), आकाश भरडकर रा. गोकूलनगर (ता. जि. गडचिरोली) यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेणे सुरु असून गुन्ह्राचा पुढील तपास मपोउपनि आश्विनी पाटील, पोस्टे चातगाव ह्या करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनी श्री. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि भगतसिंग दुलत, पोहवा सुधाकर दंडीकवार, पोना धनंजय चौधरी, चापोअ दिपक लोणारे यांनी पार पाडली.







