Home गडचिरोली माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी केली स्व. गजाननराव थुटे यांना भावपूर्ण...

माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी केली स्व. गजाननराव थुटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

157
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

चिमूर : तालुक्यातील मु. बोथली (वहाणगाव) येथील भारतीय जनता पार्टीचे किसान नेते व ओबीसी समाजाचे मान्यवर नेते एकनाथराव थुटे यांचे वडील स्वर्गीय गजाननराव थुटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित चौदावी (तेरावी) कार्यक्रमास माजी खासदार तथा भारतीय जनता पक्ष अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास पुष्पांजली अर्पण करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

याप्रसंगी डॉ. नेते यांनी थुटे कुटुंबियांचे सांत्वन करत आपल्या मनोगतात म्हटले की, स्व. गजाननराव थुटे हे कर्तृत्ववान, आदर्शवादी आणि समाजहितासाठी आयुष्यभर झटणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कार्याची दिशा आणि विचारांची परंपरा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांनी जपलेली मूल्यनिष्ठ परंपरा हीच त्यांची खरी ओळख आहे, असे मत मा. खा. डॉ. नेते यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला राज्य परिषदेचे सदस्य तथा ज्येष्ठ नेते डॉ. श्यामजी हटवादे, भाजयुमो चिमूर तालुकाध्यक्ष बालुभाऊ पिसे, मनोहर थुटे, पोलीस पाटील आनंद थुटे, सदानंद थुटे, जोगेश्वर थुटे, ठाकरे, चौधरी, विखार, अनिल महाजन, रुपराज थुटे, प्रशांत काथवटे यांच्यासह थुटे परिवारातील नातेवाईक, स्थानिक नागरिक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!