Home गडचिरोली गडचिरोलीत 12 ऑक्टोबरला जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक

गडचिरोलीत 12 ऑक्टोबरला जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक

62

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा समान अधिकार दिलेला आहे. मात्र सध्याचे हुकूमशाही भाजप सरकार सत्तेचा दुरुपयोग करून आणि निवडणूक आयोगाला हाताशी घेऊन मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ करून निवडणुका जिंकत असल्याचा गंभीर आरोप लोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते माननीय राहुलजी गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केला आहे.

यानंतर काँग्रेस पक्षाने विविध स्तरांवर केलेल्या चौकशीत अनेक डुप्लिकेट मतदार तसेच इतर गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील मतदार यादीतही मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे निदर्शनास आले असून, त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही निश्चित करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन उद्या, 12 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येथे करण्यात आले आहे.

या बैठकीला सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, सेल अध्यक्ष व तालुका अध्यक्षांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!