Home गडचिरोली माजी मंत्री आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते सिरोंचा येथे विकास कामांचे भूमिपूजन

माजी मंत्री आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते सिरोंचा येथे विकास कामांचे भूमिपूजन

60
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : माजी कॅबिनेट मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते अहेरी विधानसभा क्षेत्रातील सिरोंचा तालुका मुख्यालयात 4 ऑक्टोबर रोजी विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

सिरोंचा नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रभागात विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न असून या माध्यमातून सिरोंचाचा चेहरा मोहरा बदलणार आहे, अशी ग्वाही आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी बोलून दाखविली आहे.

याप्रसंगी सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम, नगराध्यक्ष फरजाना शेख, उपाध्यक्ष बबलू पाशा, मधुकर कोल्लूरी, सतीश गंजीवार, लक्ष्मण येरावार, महेश तिवारी, सतीश भोगे, सतीश राचर्लावार, क्रिष्णामूर्ती रिकुला, रवी सुलतान, व्यंकटलक्ष्मी आरवेली, सत्यम पिडगु आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!