Home गडचिरोली पीक नुकसान भरपाई देऊन धानाला हमीभाव दुप्पट करावा

पीक नुकसान भरपाई देऊन धानाला हमीभाव दुप्पट करावा

52
Oplus_16908288

– माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : यंदा वारंवार संततधार पाऊस पडत असल्याने धान पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी धानपिकाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही परिस्थिती लक्षात घेता महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि यंदा हमी भावाच्या दुप्पट म्हणजे 5 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल धानाला हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी केली आहे.

यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात 1 लाख 72 हजार क्षेत्रावर धान पिकांची पेरणी झालेली आहे. मात्र यंदाच्या वारंवार पडणाऱ्या संततधार पावसामुळे व पूरपरिस्थितीमुळे धान पिके सडली. परिणामी धान पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले असल्याने शेतकरी नाराज झाले आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाने सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व धानाला दुप्पट हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी केली आहे.

error: Content is protected !!