Home गडचिरोली अतुल गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

अतुल गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

62

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शप) पक्ष गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जसे की, मतिमंद मुलांसाठी शालेय गणवेश वितरण, महिलांना ब्लँकेट वाटप, रुग्णालयातील रुग्णाच्या नातेवाईकांना अन्नदान, वृक्षारोपण या सारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले.

त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून गण्यारपवार फाऊंडेशन चामोर्शी तथा महात्मे आय हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार, ९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बाजार समितीचे पाठीमागे आशीर्वाद सभागृह गोकुळनगर येथे मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू तपासणी करण्यात आली.

सर्व प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गडचिरोलीचे शहर अध्यक्ष विजय गोरडवार यांच्या हस्ते फित कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी (शप) चे प्रदेश चिटणीस ॲड. संजय ठाकरे , जिल्हा उपाध्यक्ष नईम शेख, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष शेमदेव चाफले, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हुसेन शेख, गण्यारपवार फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अमोल गण्यारपवार, जिल्हा उपाध्यक्ष संजय शृंगारपवार, महिला जिल्हाध्यक्ष संगीता राऊत, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष वैभव शिवणकर, माजी नगरसेविका संध्या उईके, माजी नगरसेविका मीनल चिमुरकर, सामाजिक कार्यकर्ते भास्कर निमजे, जिल्हा उपाध्यक्षा विमल भोयर, सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष सुनील चिमुरकर, युवक शहर अध्यक्ष विवेक कांबळे, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्षा नीता बोबाटे, करिश्मा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी २५० लोकांना मोफत तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले. तर जवळजवळ १०० हून अधिक रुग्णांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देण्यात येणार आहे. सुमारे ५०० हून अधिक लोकांनी शिबिरात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोनु पठाण, बेबी लभाणे, मल्लया कालवा, नीलेश कोटगले, राजू डांगेवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!